Last Updated: Monday, January 14, 2013, 12:54
www.24taas.com,अहमदाबादजगभरात औत्स्युक्याचा विषय असलेला काशीच्या महाकुंभ मेळ्याला आज सुरुवात झालीये. सन २०००नंतर यंदा पुन्हा अहमदाबादमध्ये महाकुंभमेळा भरलाय. मकरसंक्रांतीच्या दिवशी होणा-या पहिल्या शाही स्नानाला गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या संगमावर लाखो भाविक दाखल झालेत.
गंगेत डुबकी मारून पहिल्या शाही स्नानाला हजेरी लावण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दर १२ वर्षांनी होणा-या या सोहळ्यात सुमारे १ कोटी भाविक सहभागी होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. २ महिने हा महाकुंभमेळा सुरू राहणार आहे. देशभरातल्या साधू-महंतांसह सर्वोच्च बौद्ध धर्मगुरू दलाई लामा, आर्ट ऑफ लीव्हिंगचे श्री श्री रविशंकर, बाबा रामदेव, आसाराम बापू आदी या कुंभमेळ्याला हजेरी लावणार आहेत.
कुंभमेळ्याला पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय. आज पहिलं शाही स्नान, २७ जानेवारीला पौर्णिमेला दुसरं, १० फेब्रुवारीला तिसरं, १५ फेब्रुवारीला वसंतपंचमीच्या दिवशी चौथे, तर २५ फेब्रुवारीला माघ पौर्णिमेला पाचवे आणि १० मार्चला महाशिवरात्रीच्या दिवशी सहावे शाही स्नान असणार आहे.
अलाहाबादसह, नाशिक, उज्जैन आणि हरिद्वारमध्ये १२वर्षांतून एकदा महाकुंभमेळ्याची पर्वणी असते. या महाकुंभमेळ्यात गंगेत स्नान केल्याने मोक्ष प्राप्त होतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
First Published: Monday, January 14, 2013, 11:22