Last Updated: Tuesday, April 1, 2014, 14:44
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्लीआता तुम्ही १ रुपया आधार मूल्य असलेलं तिकीट घेऊन स्पाइस जेट एअरलाईन्सच्या डोमेस्टिक विमानाद्वारे प्रवास करू शकता. स्पाइसजेटनं आज डोमेस्टिक प्रवासासाठी तिकीटांचा तीन दिवसीय सेल लावल्याची घोषणा केलीय. या तिकीटाचं आधार मूल्य केवळी १ रुपया आहे. प्रवास करण्यासाठी तुम्हाला आधार मूल्याच्या व्यतिरिक्त फक्त टॅक्स आणि अधिक फी द्यावी लागेल.
सेल असल्यानं त्याद्वारे विकली जाणारी स्पाइस जेटची तिकीटं डायरेक्ट फ्लाईट्ससाठी असेल. स्पाइस जेटच्यावतीनं देण्यात आलेल्या माहितीनुसार १ एप्रिल ते ३ एप्रिलदरम्यान स्पाइस जेट साईटवरून हे तिकीटं तुम्ही बूक करू शकता. सूट जरी तीन दिवसांसाठी असली तरी तिकीटांची विक्री लवकरच संपेल, अशी आशा स्पाइस जेटनं व्यक्त केलीय.
एक रुपयाची ऑफर असलेलं विमानाचं तिकीट तुम्हाला फक्त ७९९ आणि १४९९ रुपयांमध्ये मिळेल. निश्चित तारीख आणि फ्लाइटसाठी विकल्या जाणाऱ्या या तिकीटांमध्ये अधिक फी आणि टॅक्स जोडलेलं नाहीय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, April 1, 2014, 14:44