Last Updated: Wednesday, June 18, 2014, 16:34
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई माफक दरांत विमान प्रवास उपलब्ध करून देणाऱ्या स्पाईस जेट विमान कंपनीनं प्रवाशांसमोर आपली आणखी एक नवीन योजना सादर केलीय.
यामध्ये देशभरातील प्रवासाची सुरुवातीची किंमत 1,999 (सर्व करांसहित) निर्धारित करण्यात आलीय.
कंपनीच्या एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, दिल्ली, कोलकता तसंच चेन्नईसहीत सर्वच देशांतर्गत विमानतळांसाठी ही योजना लागू होईल.
या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ग्राहकांना तिकिट बुकिंग 17 जून ते 19 जूनपर्यंत करावं लागेल. या तिकिटांवर ग्राहक 19 जुलै ते 30 सप्टेंबर 2014 पर्यंत कधीही करू शकतात.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, June 18, 2014, 08:36