Last Updated: Monday, February 24, 2014, 14:07
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई विमान प्रवास करू इच्छिणाऱ्यांना आणि वाढलेल्या तिकिटांचे दर पाहून धास्ती भरलेल्या प्रवाशांसाठी एक खूशखबर आहे.
विशेष सूट जाहीर करत स्पाईसजेटनं आपल्या तिकीट दरांमध्ये तब्बल ७५ टक्क्यांनी घट केलीय. गेल्या एका महिन्यात ही स्पाइसजेटनं आपल्या तिकीटांत केलेली ही तिसरी घट आहे. कलानिधी मारन यांनी प्रमोट केलेल्या या विमान कंपनीनं उन्हाळ्याच्या दिवसांत प्रवाशांना चांगली सुविधा मिळण्यासाठी आपल्या किंमतीत घट केल्याचं म्हटलंय.
`स्पाईटजेट` यासंबंधी घोषणा करताना ही सूट बुधवारी अर्ध्या रात्रीपर्यंत ही सुरू राहील, असं म्हटलंय. १ एप्रिल ते ३० जूनदरम्यान उपलब्ध असलेल्या विमानप्रवासासाठी प्रवाशांना तब्बल ७५ टक्के सूट मिळणार असल्याचं स्पाइसजेटनं म्हटलंय. याशिवाय इंधन अधिभारही कमी होईल जो तो प्रवासासाठी होणाऱ्या खर्चाशी जोडलेला असेल.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, February 24, 2014, 14:07