Last Updated: Wednesday, March 27, 2013, 16:29
www.24taas.com,चेन्नईसंयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या श्रीलंकाविरोधी प्रस्तावास मान्यता द्या आणि श्रीलंकेला मित्रराष्ट्र मानू नका, अशा मागण्या तामिळनाडू विधानसभेनं केंद्र सरकारकडे केल्यात. विधानसभेनं आज एकमतानं हा ठराव मंजूर केला.
श्रीलंकेतल्या तामिळींचं खच्चिकरण थांबत नाही, तोपर्यंत त्या देशावर आर्थिक निर्बंध टाकावेत, अशी मागणीही या ठरावात करण्यात आलीये. हा ठराव एकमतानं संमत झाल्यानंतर जयललिता यांनी केंद्र सरकार आणि डीएमकेवर तोफ डागली.
श्रीलंकेमध्ये तामिळींच्या दडपशाहीला उधाण आलेलं असताना हे दोन्ही पक्ष निष्प्रभ ठरल्याचा आरोप त्यांनी केला. राज्यभर सुरू असलेला विद्यार्थ्यांचा संप तामिळींच्या भावना किती तीव्र आहेत, हे दर्शवतो. मात्र विद्यार्थ्यांनी हा संप मिटवून कॉलेजेस सुरू होऊ द्यावीत, असं आवाहनही त्यांनी केलं.
First Published: Wednesday, March 27, 2013, 16:28