राधारानी मंदिरात चेंगराचेंगरी, दोन महिला ठार Stampede in Radharani temple

राधारानी मंदिरात चेंगराचेंगरी, दोन महिला ठार

राधारानी मंदिरात चेंगराचेंगरी, दोन महिला ठार
www.24taas.com, मथुरा

उत्तर प्रदेशात मथूरेजवळ बरसाना राधारानी मंदिरात चेंगराचेंगरी झाल्याची माहिती आहे. यामध्ये दोन महिलांचा मृत्यू झालाय. तर आठरा जण जखमी झालेत.

आज राधाष्टमीनिमित्त मंदिरात हजारो भाविक जमले होते... आजच्या दिवशी पहाटे चार वाजता मंदिरात पंचामृत अभिषेक केला जातो.. हा विधी पाहण्यासाठी देशविदेशातून दरवर्षी हजारो भाविक इथं येत असतात. आजही अशीच गर्दी होती.

पूजा झाल्यानंतर बाहेर पडण्यासाठी असलेल्या छोट्या दरवाजाजवळ भाविकांची प्रचंड गर्दी झाली. याचं रुपांतर चेंगराचेंगरीत झालं. यात 2 महिलांचा मृत्यू झालाय, तर किमान 18 जण जखमी झालेत...

First Published: Sunday, September 23, 2012, 10:44


comments powered by Disqus