Last Updated: Sunday, October 13, 2013, 18:21
www.24taas.com, झी मीडिया, दातियामध्यप्रदेशातील दातिया जिल्ह्यात रतनगढ माता मंदिराबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत ७५ जण ठार झालेत तर १०० हून अधिक जण जखमी झालेत. यातील अनेक जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा आणखीन वाढण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.
मंडुला देवीचं हे मंदिर असून आज दस-यानिमित्त मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाविक जमा झाले होते. दरम्यान या मंदिराजवळील सिंध नदीच्या पुलावर चेंगराचेंगरी झाली.. त्यामुळे काही भाविकांनी पाण्यात उड्या मारल्या. एका तरुणांच्या टोळीने लवकर दर्शन मिळावं म्हणून पुल तुटायला आल्याची अफवा पसरवल्यानं या ठिकाणी चेंगराचेंगरी झाल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.
घटनेची माहिती मिळताच जिल्हाधीकारी, पोलीस अधिक्षक आणि स्थानिक नेत्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Sunday, October 13, 2013, 17:19