Last Updated: Saturday, January 11, 2014, 12:04
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली ‘कांदा खाणंच बंद करा, किंमती आपोआप कमी होतील...’ लोकांना असा सल्ला दिलाय देशातील सर्वोच्च न्यायालयानं...
सरकारला कांदा आणि इतर भाज्यांच्या किंमतीवर नियंत्रण ठेवण्याचा आदेश देण्याची मागणी करणारी एक जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयानं शुक्रवारी मांडली गेली. मात्र, ती फेटाळून लावत सर्वोच्च न्यायालयानं या जनहित याचिकेला केराची टोपली दाखवली.
न्यायमूर्ती बी. एस. चौहान यांच्या अध्यक्षतेखाली सर्वोच्च न्यायालयाच्या पीठानं यावेळ लोकांनाच कांदा खाणं बंद करण्याचा सल्ला दिला. ‘कांदा खाणंच बंद करा, किंमती आपोआप कमी होतील...’ असं त्यांनी यावेळी म्हटलं. शिवाय न्यायालयावर अशा जनहित बाबींचा न्यायालयावर ओझं टाकणं योग्य नाही, असा उपदेशदेखील याचिकाकर्त्यांना केला.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, January 11, 2014, 12:04