Last Updated: Tuesday, June 18, 2013, 16:20
www.24taas.com, झी मीडिया, विलासपूरआपल्या गर्लफ्रेंडवर पैसे उडवण्यासाठी शहरात चोऱ्या करणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी अटक केलं. यातील एक तरुण अल्पवयीन विद्यार्थी आहे. रस्त्याने जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या चेन, पर्स इत्यादी वस्तू चोरून ही मुलं गर्लफ्रेंड्सना गिफ्ट्स देत असत.
पोलिसांनी घेतलेल्या झडतीत या मुलांकडील एटीएम कार्ड, रिकामं पाकीट, मोबाइल आणि बाइक जप्त केली आहे. चोरी केलेल्या बाइकची नंबर प्लेट बदलण्यासाठी दोघांनी एक गॅरेजवाल्याकडे मदत मागितली होती. यावरून गॅरेजवाल्याला संशय आला. त्याने तात्काळ पोलिसांना फोन केला आणि पोलिसांनी दोघांना पकडलं.
अटक केल्यावर झालेल्या चौकशीत दोन्ही मुलीं आपणच चोऱ्या करत असल्याचं कबुल केलं. यातील एक मुलगा अल्पवयीन आहे, तर एक मोबाइल कंपनीत सर्व्हिसला आहे. दोघांनी शहरात तब्बल १५ चोऱ्या केल्या होत्या. या चोऱ्या करण्यामागील कारण गरिबी नसून आपल्या गर्लफ्रेंड्सना ‘इंप्रेस’ करणं हे होतं. चोरी केलेले दागिने ते गर्लफ्रेंड्सना गिफ्ट म्हणून देत. गेले अनेक महिने ते चोरीच्या पैशातून अशा प्रकारची अय्याशी करत होते.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Tuesday, June 18, 2013, 16:20