महाजनांचा लोकसभा अध्यक्षपदासाठी प्रस्ताव,Sumitra Mahajan, president of the parliamentary proposal to

सुमित्रा महाजन यांचा लोकसभा अध्यक्षपदासाठी प्रस्ताव

सुमित्रा महाजन यांचा लोकसभा अध्यक्षपदासाठी प्रस्ताव
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

मुळच्या कोकणातल्या चिपळूणच्या असलेल्या इंदूरच्या खासदार सुमित्रा महाजन यांची लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड जवळजवळ निश्चित झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्वच पक्षांच्या नेत्यांनी महाजन यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवलाय.

मोदी, लालकृष्ण अडवाणी, रामविलास पासवान, अनंत गिते या एनडीएतल्या खासदारांसह काँग्रेसचे लोकसभेतले नेते मल्लिकार्जून खरगे, IAIDMKचे एम. थंबीदुराई, तृणमूलचे सुदीप बंदोपाध्याय, बीजेडीचे एम. महताब, समाजवादी पार्टीचे मुलायमसिंग यादव, जेडीएसचे एच.डी. देवेगौडा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे आदी असे 19 जण महाजन यांच्या नावाचे प्रस्तावक आहेत.

सुमित्रा महाजन सलग आठ वेळा लोकसभेवर निवडून आल्या आहेत. भाजप नेते व्यंकय्या नायडू यांनीही महाजन लोकसभा अध्यक्ष होतील असा विश्वास व्यक्त केलाय. महाजन यांच्या मूळ गावी म्हणजे चिपळूणमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, June 5, 2014, 23:35


comments powered by Disqus