ओव्हर डोसमुळे सुनंदाचा मृत्यू, शरीरावर १२ जखमा – रिपोर्ट, drug overdose cause of death

ओव्हर डोसमुळे सुनंदाचा मृत्यू, शरीरावर १२ जखमा – रिपोर्ट

ओव्हर डोसमुळे सुनंदाचा मृत्यू, शरीरावर १२ जखमा – रिपोर्ट

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

केंद्रीय मंत्री शशी थरूर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांची पोस्टमार्टम रिपोर्ट एम्सच्या डॉक्टरांना आज एसडीएम पोलिसांकडे सोपवली आहे. एसडीएम सुनंदा पुष्कर यांच्या रहस्यमय मृत्यूची चौकशी करीत आहेत. पोस्टमार्टम रिपोर्टनुसार सुनंदाचा मृत्यू हा औषधांच्या ओव्हरडोसने झाल्याचे सांगण्यात येत आहे.

सुनंदा पुष्कर यांच्या शरीरावर १२ ते १५ जखमा असल्याचे पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे त्याचा मृत्यू हा स्वतः औषधांचा ओव्हर डोसने झाला की त्यांना ओव्हर डोस देण्यात आला याबाबत आता गूढ वाढले आहे.

यापूर्वी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांनी रविवारी एसडीएमसमोर आपली साक्ष दिली होती. अर्धा तासांपेक्षा अधिक काळ त्यांनी आपली साक्ष नोंदवली. यात थरूर यांनी मृत्यूपूर्वीच्या घटनांबद्दल सांगितले.

शुक्रवारी रात्री ५२ वर्षीय सुनंदा पुष्कर यांचा दिल्लीतील हॉटेल लीलामध्ये मृत्यू झाला होता. याच्या दोन दिवसांपूर्वी थरूर आणि पाकची महिला पत्रकार मेहर तरार यांच्याशी कथीत संबंधावरून सुनंदा आणि तरार यांच्यात ट्विटरवर मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर सुनंदा आणि थरूर यांनी संयुक्त वक्तव्य जाहीर करून त्यांचे जीवन सुखी असल्याचे सांगितले होते.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, January 20, 2014, 19:25


comments powered by Disqus