पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींना RSSचा उघड पाठिंबा, support for Narendra modi disclose to RSS

पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींना RSSचा उघड पाठिंबा

पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींना RSSचा उघड पाठिंबा
www.24taas.com , झी मीडिया, मुंबई

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित, करा अशी मागणी भाजपतल्याच अनेक गटांनी केलीय. मात्र अजूनही या मुद्द्यावर भाजपत एकवाक्यता नाही. असे असताना RSSने उघड पाठिंबा देत मोदींचा मार्ग मोकळा करून दिला आहे.

शिवसेनेने आधी पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करावा, मग पाठिंब्याबाबत आमची भूमिका स्पष्ट करू असे म्हटले होते. तर दोन दिवसांपूर्वी सामनातून मोदींचा समाचार घेतला होता. मात्र आता प्रत्यक्ष आरएसएसने नरेंद्र मोदींच्या पारड्यात आपलं वजन टाकले आहे. आरएसएस आणि भाजप यांच्यात झालेल्या दोन दिवसीय बैठकीत मोदींच्या नावाची चर्चा झाली. त्यात मोदींच्या नावाची चर्चा झाली. देशाला सध्या नेतृत्व बदलाची गरज आहे. आणि मोदींच्याच पाठीशी जनतेचा कौलही आहे असं आरएसएसने म्हटले आहे.

आरएसएसच्या भूमिकेनंतर भाजप मोदींच्या नावाची जाहीर घोषणा करणार काय, याची चर्चा सुरू झाली आहे. सध्या मोदींच्या देशातील प्रमुख शहरांमध्ये सभा घेतल्या जात असून रॅली काढण्यात येत आहे. गोव्यातील राष्ट्रीय कार्यकारणीत नरेंद्र मोदींचे नाव लोकसभा निवडणूक प्रचार समितीचे प्रमुख पद बहाल करण्यात आले होते. त्यामुळे पंतप्रधान पदाचे तेच उमेदवार असतील काय, याची उत्सुकता लागली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

पाहा व्हिडिओ

First Published: Tuesday, September 10, 2013, 13:02


comments powered by Disqus