Last Updated: Tuesday, May 21, 2013, 14:03
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्लीमहिलेशी संमतीनं शरीरसंबध ठेवणे म्हणजे बलात्कार होत नाही असा महत्त्वपूर्ण निकाल सुप्रीम कोर्टानं दिलाय. बलात्कार आणि संमतीनं शरीरसंबध यात मोठा फरक असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे.
पंजाब हरियाणा हायकोर्टाच्या एका निकालास दिलेल्या आव्हान प्रकरणावरील सुनावणीत कोर्टानं हे मत नोंदवलयं. एका पुरुषानं एका महिलेस लग्नाचं आश्वासन दिलं, यातून त्यांच्यात संमतीनं शरीरसंबध प्रस्थापित झाले. पण परिस्थितीमुळं लग्नाचं वचन त्याला पाळता आलं नाही. तर तो गुन्हा होऊ शकणार नाही असं कोर्टानं म्हटलं आहे.
या प्रकरणात पुरुषाचा हेतू प्रामाणिक होता हे सिद्ध होणं गरजेचं आहे असंही कोर्टानं म्हटलं आहे. निकाल दिलेल्या आरोपीची त्याच्या १८ वर्षीय मैत्रिणीशी लग्न करण्याची इच्छा होती. मात्र त्याने लग्नास नकार दिल्यानंतर त्यांच्याविरोधात तिने फिर्याद दाखल केली होती.
First Published: Tuesday, May 21, 2013, 14:03