Last Updated: Tuesday, July 23, 2013, 20:30
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्लीबेकायदा शस्त्रे बाळगल्याप्रकरणी सध्या पुण्याच्या येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगत असलेला अभिनेता संजय दत्त याची क्युरेटिव्ह याचिका आज सुप्रीम कोर्टाने फेटाळली. त्याला ठोठावण्यात आलेल्या शिक्षेचा पुनर्विचार करण्याची विनंती करून त्याने फेरविचार याचिका दाखल केली होती. सुप्रीम कोर्टाने फेरविचार याचिका फेटाळल्यानंतर संजयने पुन्हा एकदा क्युरेटिव्ह याचिका कोर्टात दाखल केली होती. परंतु ती याचिकाही कोर्टाने आज फेटाळली.
संजय दत्तला मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी २१ मार्च २०१३ रोजी पाच वर्षांची शिक्षा सुनावली गेली होती. यापैकी १८ महिने त्याने कारागृहात काढले आहेत.
बेकायदा शस्त्रे बाळगल्याप्रकरणी टाडा न्यायालयाने २००६ मध्ये संजय दत्तला दोषी ठरवत सहा वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्याने केलेला गुन्हा अतिशय गंभीर असल्याचे कोर्टाने म्हटले होते.
संजूबाबा आजारी, मुंबईला हलविणारशस्त्रास्त्रे बाळगल्याप्रकरणी येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत असलेला बॉलीवूड अभिनेता संजय दत्त याची प्रकृती बिघडली आहे. जादा धूम्रपान आणि उच्च रक्तदाब हे त्याच्या प्रकृती बिघडली आहे. यावरील उपचारासाठी त्याला मुंबईतील जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे.
चार डॉक्टरांच्या एका टीमने गेल्या शनिवारी तुरुंगात जाऊन संजय दत्तची वैद्यकीय तपासणी केली आणि त्याला सीटी ऍन्जिओग्राम आणि आर्टेरियल ऍन्जिओग्राफी करण्याचा सल्ला दिला. या पथकातील एका डॉक्टरच्या मते संजय दत्तला पेरिफेरियल आर्टेरियल डिसीज अर्थात पॅड याचा त्रास जाणवत आहे.
या व्याधीमुळे त्याच्या दोन्ही पायांपर्यंत होणार्याम रक्ताच्या पुरवठ्यात खंडितपणा आला आहे. डॉक्टरांच्या पथकाने संजय दत्तबाबत दिलेल्या सल्ल्याची दखल घेऊन येरवडा तुरुंग अधिकार्यांनी संजय दत्तवर जे. जे. रुग्णालयात उपचार करून घेण्याचे ठरविले आहे. त्यासाठीची मंजुरी मिळावी यासाठी राज्य सरकारकडे तसा प्रस्ताव पाठवला आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Tuesday, July 23, 2013, 20:30