Last Updated: Tuesday, September 3, 2013, 16:13
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली आसाराम बापूंना दिल्या जात असलेल्या सुरक्षेबाबत सुप्रीम कोर्टानं ताशेरे ओढलेत. कोर्टानं आसाराम बापूंचं नाव घेतलेलं नाही. मात्र, व्हीव्हीआयपी सुरक्षेबाबत टिप्पणी करताना एका आरोपीला इतकी सुरक्षा का दिली जात आहे, असा सवाल करत कोर्टानं पोलीस यंत्रणांना फटकारलं.
१४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलेल्या स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू आसाराम बापूंच्या जामिनावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे आसाराम बापूंना जेलमध्येच रहावं लागतंय की जामीन मंजूर केला जातो, याकडे लक्ष लागलंय.
एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा गुन्हा त्यांच्यावर नोंदवण्यात आलाय. त्यानंतर शनिवारी रात्री अटक झाली होती. एक दिवसाची पोलीस कोठडी संपत असल्यानं त्यांना सोमवारी पुन्हा जोधपूरमध्ये न्यायालयात हजर करण्यात आलं.
पोलिसांनी त्यांची कोठडी न मागिल्यामुळे आसाराम बापूंना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत धाडण्यात आलंय. मात्र, आता त्यांच्या जामिनावर काय निर्णय होतो याकडे लक्ष लागलंय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, September 3, 2013, 16:13