Last Updated: Sunday, April 7, 2013, 16:48
www.24taas.com , नवी दिल्ली सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरविण्यात आलेल्या आठ गुन्हेगारांच्या फाशीला चार आठवड्यांची स्थगिती दिली. संसद हल्ल्यातील प्रमुख आरोपी अफजल गुरूला फाशी देण्यात आल्यानंतर त्याचे दफन जेलच्या आवरात केले. मात्र गुरूच्या नातेवाईकांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने त्याच्या बाबतीत जी चूक घडली त्याची पुनरावृत्ती होऊ नये. याची खबरदारी घेत न्यायालयाने स्थगिती दिली
दोषी ८ आरोपींचे द्या अर्ज याच आठवड्यात राष्ट्रपतीं प्रणव मुखर्जीकडून फेटाळण्यात आले होते.पीपल युनियन डेमोक्रेटिक राइट्स नामक सामाजिक संस्थेने या ८ जणांच्या फाशीवर स्थगिती मिळण्यासाठी कोर्टात याचिका दाखल केली होती. न्यायाधीश सदाशिवम यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी झाली. न्यायाधीश सदाशिवम आणि न्यायाधीश इकबाल यांनी या स्थगितीचा
संसदेवर हल्ला करणाऱ्या अफजल गुरूला अतिशय गुप्तपणे फाशी देणयात आली होती आणि त्याला तुरूंगात दफन करण्यात आले होते. त्यावर अफजल गुरूच्या कुटूंबाने त्यांना फाशी देणार असल्याची पुर्वसूचना दिली नव्हती असा आरोप केला होता.
First Published: Sunday, April 7, 2013, 16:48