सीबीआय घटनाबाह्यप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती, Supreme Court stays Gauhati HC`s order terming CBI `illegal`

सीबीआय घटनाबाह्यप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

सीबीआय घटनाबाह्यप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
www.24taas.com, वृत्तसंस्था, नवी दिल्ली

सीबीआय घटनाबाह्य असल्याचा निर्णय गुवाहाटी उच्च न्यायालयाने दिला होता. त्याला सर्वोच्च न्यायालयाने आज स्थगिती दिलीय. याबाबतची पुढची सुनावणी आता ६ डिसेंबरला होणार आहे.

याचिकाकर्त्यांना सर्वोच्च न्यायालयाने २ आठवड्यांचा अवधी दिलाय. CBIची स्थापना घटनाबाह्य असल्याच्या गुवाहाटी हाय कोर्टाच्या निर्णयाला आज केंद्र सरकारने सुप्रिमकोर्टात आव्हान दिलं होतं. यावर केंद्र सरकारतर्फे उच्च न्य़ायालयात अपिल करण्यात आलं होतं.

CBIची स्थापना आणि कार्यपद्धती घटनाबाह्य असल्याचा धक्कादायक निकाल गुवाहाटी हाय कोर्टानं दिला होता. गुवाहाटी हाय कोर्टाच्या या निर्णयाचा नऊ हजार निर्णयांवर परिणाम होणार होता. हायकोर्टानं आमची बाजू ऐकून न घेता निर्णय दिल्याचा आरोप केंद्रसरकानं केलाय. त्यामुळे CBIला घटनाबाह्य ठरवणं चुकीचं असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं होतं.

सीबीआयची स्थापना व त्यांचे सर्व कामकाज घटनाबाह्य असल्याचा धक्कादायक निकाल गुवाहाटी उच्च न्यायालयाने गुरुवारी दिला होता. नवेंद्र कुमार यांच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती आय. ए. अन्सारी व इंदिरा शाह यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला होता.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, November 9, 2013, 18:21


comments powered by Disqus