सुप्रियांची मराठीत शपथ, मात्र अनंत गितेंना मराठीचं वावडं supriya oath in marathi

सुप्रियांची मराठीत शपथ, मात्र अनंत गितेंना मराठीचं वावडं

सुप्रियांची मराठीत शपथ, मात्र अनंत गितेंना मराठीचं वावडं

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

सुप्रिया सुळे आणि रावसाहेब दानवे यांनी खासदारकीची मराठीतून शपथ घेतली आहे. मात्र शिवसेनेचे अनंत गिते यांनी हिंदीतून शपथ घेतली आहे.

नवनिर्वाचित खासदारांनी सोळाव्या लोकसभेसाठी आज शपथ घेतली. यावेळी अनेक खासदार आपल्या मातृभाषेत शपथ घेत होते.

मात्र शिवसेनेच्या अनंत गिते यांनी हिंदीतून शपथ घेतली, मराठीचा मुद्दा सतत लावून धरणाऱ्या शिवसेनेच्या अनंत गिते यांनी हिंदीतून शपथ घेतल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

सुषमा स्वराज आणि उमा भारती यांनी संस्कृतमधून शपथ घेतली. कर्नाटकचे सदानंद गौडा, अनंतकुमार यांनी कन्नडमध्ये, तर हरसिमरत कौर बादल यांनी पंजाबीत शपथ घेतली.



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, June 5, 2014, 18:34


comments powered by Disqus