Last Updated: Thursday, August 16, 2012, 12:16
www.24taas.com, नवी दिल्लीआसाममधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कठोर पावलं उचलण्याची मागणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केली आहे. देशात घातपाती कारवाया करण्याचा विदेशी शक्तींचा डाव असेल, तर सरकारने वेळीच यावर कडक पावलं उचलावी, असंही गडकरी म्हणाले.
कर्नाटकात अनेकजण हल्ल्याच्या भीतीनं शहर सोडून जाऊ लागलेत. हल्ल्याच्या भीतीने कोणीही शहर सोडून जाऊ नये, त्यांना पुरेसं संरक्षण देण्यात येईल, याबाबत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याचंही गडकरींनी सांगितलं.
तर कर्नाटकातून शहर सोडून जाण्याची वाढती संख्या लक्षात घेता, तिथं आणखी ट्रेन पाठविण्याच्या सूचना केल्याचं केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी सांगितलं आहे. या लोकांना पुरेसं संरक्षण देण्यात येईल, त्यांनी शहर सोडून जाऊ नये, असं आवाहनही शिंदे यांनी केलं आहे.
First Published: Thursday, August 16, 2012, 12:16