मीडियाबाबत सुशीलकुमार शिंदेंची कोलांटी, Shinde clarifies on `crushing media` comment; BJP slams

मीडियाबाबत सुशीलकुमार शिंदेंची कोलांटी

मीडियाबाबत सुशीलकुमार शिंदेंची कोलांटी
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

सोलापूरमध्ये मीडियावर टार्गेट करताना मीडियाला ठेचण्याची वेळ आली आहे, अशी धमकी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली होती. मात्र, या वादग्रस्त व्यक्तव्यावर शिंदे यांनी घुमजाव केले आहे. आपल मीडियाला नाही तर सोशल मीडियाला म्हटले, असा खुलासा शिंदे यांनी केलाय.

लोकांमध्ये चुकीचा संदेश पोचवत असलेल्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांना चिरडून टाका, असे वादग्रस्त वक्तव्य शिंदे यांनी केले होते. सोलापूर येथे रविवारी एका सभेत बोलताना सुशीलकुमार यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमांना लक्ष्य केले होते व त्यांना चिरडून टाकू असेही म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर माध्यमांकडून जोरदार टीका झाल्यानंतर, त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

कर्नाटक आणि हैदराबादमध्ये ईशान्येकडील राज्यांतील विद्यार्थ्यांना लक्ष्य करण्यात येत असल्याने मी सोशल मीडीयाबद्दल असे वक्तव्य केले होते. इलेक्ट्रॉनिक माध्यमांना चिरडून टाकण्याचे वक्तव्य मी कधीच केलेले नाही, अशी पलटी शिंदे यांनी मारली.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

पाहा व्हिडिओ

First Published: Tuesday, February 25, 2014, 16:43


comments powered by Disqus