Last Updated: Tuesday, August 20, 2013, 13:38
www.24taas.com , झी मीडिया, नवी दिल्लीभारतीय निवडणूक अभियान समिती अध्यक्ष नरेंद्र मोदी पक्षाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार जाहीर करण्यात आले असले तरीही किंवा त्यांच्याकडे पाहिले जात असले तरी मंगळवारी काहीकाळ पंतप्रधान खुर्चीवर सुषमा स्वराज बसल्या.
सभागृह नेते तसेच संरक्षण मंत्री सुशीलकुमार शिंदे उपचानंतर दिल्ली पोहोचले. त्यानंतर ते लोससभेत गेलेत. सभागृहाची कार्यवाही सुरू होण्याआधी अनेक पक्षांचे खासदार शिंदे यांच्या तब्बेतीची चौकशी करत होते. यावेळी विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराजही शिंदे यांच्या चौकशीसाठी गेल्यात. त्याचवेळी त्या पंतप्रधानांच्या आसनावर बसल्यात.
सभागृहात सभागृह नेता आणि पंतप्रधान मंत्री यांच्या बसण्याची जागा एकाच ठिकाणी आहे. त्यावेळी शिंदे हे आपल्या खुर्चीत बसले होते. त्यावेळी चौकशी करण्यासाठी आलेल्या स्वराज शिंदेच्या शेजारी असलेल्या पंतप्रधानांच्या खाली असलेल्या खुर्चीत बसल्यात.
यावेळी केंद्रीय मंत्री गिरीजा व्यास यांनी हसण्यास सुरूवात करून अन्य सदस्यांचे लक्ष वेधत इशारा केला. यावेळी काही पत्रकारांचे लक्ष सुषमा स्वराज यांच्याकडे गेले. यावेळी शिंदे यांची चौकशी समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायम सिंग, शिवसेना, जनता दल युनायटेड, द्रमुक तसेच अन्य राजकीय पक्षांच्या सदस्यांनी केली.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Tuesday, August 20, 2013, 13:38