Last Updated: Monday, September 3, 2012, 10:16
www.24taas.com, नांदेडनांदेड जिल्ह्यातल्या आणखी एका संशयित दहशतवाद्याला बंगळुरूत अटक करण्यात आली आहे. महम्मद अक्रम देगलूरचा रहिवासी असून एटीएसनं त्याला 29 ऑगस्टला अटक केली.
यापूर्वीही एटीएकनं नांदेडचेच रहिवासी असलेल्या चार संशयित दहशतवाद्यांना नांदेडमधून अटक केली होती. त्यामुळं आता अटकेत असलेल्यांची संख्या पाचवर गेली आहे.
हे सर्व संशयित पुणे आणि बंगळुरू बॉम्बस्फोटांतील आरोपी असून या निमित्तानं पुन्हा एकदा बॉम्बस्फोटांचे नांदेड कनेक्शन पुढं आलंय.
First Published: Monday, September 3, 2012, 10:16