समस्या घेऊन आलेल्या दर्दींची गर्दी, दिल्लीत `आप`चा जनता दरबार फसला, suspension of `Janta Darbar` du

समस्या घेऊन आलेल्या दर्दींची गर्दी, दिल्लीत `आप`चा जनता दरबार फसला

समस्या घेऊन आलेल्या दर्दींची गर्दी, दिल्लीत `आप`चा जनता दरबार फसला

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा जनता दरबार जनतेच्या गर्दीने ओसांडून वाहू लागल्याने, सध्या तरी फसला आहे.

दि्ल्लीतील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अरविंद केजरीवाल यांनी जनता दरबाराचं आयोजन केलं होतं. या दरबारात समस्या घेऊन आलेल्या लोकांची गर्दी खूप मोठ्या प्रमाणात झाली.

अखेर मुख्यमंत्र्यांनी छतावर येऊन लोकांची समजूत काढावी लागली, मात्र गर्दी वाढत गेल्याने अरविंद केजरीवाल यांनी दरबारातून काढता पाय घेतला.

अखेर अरविंद केजरीवाल यांनी मीडियाच्या माध्यमातून सूचना दिली, आणि यापुढे गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी आपण दुसऱ्या ठिकाणी जनता दरबाराची व्यवस्था करणार असल्याचं अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं.

जनतेच्या समस्या ऐकून घेण्यासाठी अरविंद केजरीवाल यांनी जनता दरबाराचं आयोजन केलं होतं. मात्र गर्दी नियंत्रणात न आल्याने समस्या ऐकता येणं अरविंद केजरीवाल यांना शक्य झालेलं नाही.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, January 11, 2014, 12:27


comments powered by Disqus