मोदीच पंतप्रधानपदासाठी योग्य- सुषमा स्वराज Swaraj Supports Modi

मोदीच पंतप्रधानपदासाठी योग्य- सुषमा स्वराज

मोदीच पंतप्रधानपदासाठी योग्य- सुषमा स्वराज
www.24taas.com, नवी दिल्ली

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदासाठी योग्य असल्याचं भाजप नेत्या सुषमा स्वराज यांनी म्हटलंय. भाजपमध्ये पंतप्रधान पदाच्या उमेदवारांची कुठलीही यादी नाही. मोदी हे सर्वार्थानं त्या पदासाठी योग्य असल्याचं स्वराज यांनी म्हटलंय.

एनडीएमध्ये पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी स्पर्धा सुरू आहे. नरेंद्र मोदी यांच्या नावावर शिक्कामोर्तब होत असतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मोदींशी चर्चा करून सध्या त्यांना उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतला होता. तर स्वतः नरेंद्र मोदींनीही आपलं संपूर्ण लक्ष गुजरातवर अशल्याचं म्हटलं होतं. मात्र नरेंद्र मोदींनाच पंतप्रधानपदाची उमेदवारी मिळण्याची शक्यता दिसत आहे.

2014ची निवडणूक मोदींच्या नेतृत्वाखाली लढवावी, असा एक मतप्रवाह असताना याला एनडीएमधून उघड तर भाजपमध्ये छुपा विरोध आहे. या पार्श्वभूमीवर स्वराज यांचं हे वक्तव्य महत्त्वाचं मानलं जातंय.

First Published: Saturday, December 1, 2012, 19:38


comments powered by Disqus