Last Updated: Monday, November 25, 2013, 15:36
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली नोएडामधील हायप्रोफाईल आरूषी हत्याकांड प्रकरणाचा आज अखेर निकाल लागलाय. यामध्ये आरुषीची हत्या तिच्या आई-वडिलांनीच म्हणजे तलवार दाम्पत्यानंच केल्याचं न्यायालयानं स्पष्ट म्हटलंय.
राजेश तलवार आणि नुपूर तलवार यांची मुलगी आरुषी आणि नोकर हेमराज यांच्या हत्या प्रकरणाचं गूढ शेवटपर्यंत कायम होतं. त्यावरून अखेर गाझीयाबादच्या सीबीआय कोर्टानं पडदा उघडलाय. यामध्ये आरुषी आणि हेमराज यांची हत्या राजेश आणि नुपूर तलवार यांनीच केल्याचं न्यायालयानं दिलेल्या निर्णयात म्हटलंय.
निकालानंतर तलवार दाम्पत्याला रडू कोसळलं. कोर्टानं या प्रकरणाचा निर्णय राखून ठेवलाय. उद्या, मंगळवारी या प्रकरणाचा निर्णय सुनावण्यात येणार आहे.
नेमकं काय घडलं होतं… आरूषीचा १६ मे २००८ ला सकाळी खून झाल्याची खबर वाऱ्यासारखी पसरली... आणि नोएडातील जलवायू विहारला पोलीस आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचा गराडा पडला... बंद घरात कोणी चौथी व्यक्ती येऊन आरूषीचा खून कसा काय केला, असा प्रश्न प्रत्येकाला पडला होता.
दबल्या आवाज आरूषीचा खून तीच्या आई-वडीलांनी म्हणजे तलवार दाम्पत्याने केला असं बोललं जात होतं. पण आरूषीचा खून नोकर हेमराजनं केल्याचं तलवार दाम्पत्य वारंवार सांगत होतं. त्यानुसार पोलीसांनी हेमराजचा कसून शोध सुरू केला. आरूषीचा खून हेमराजनचं केल्याचं सर्वांना वाटत होतं. कारण आरूषीच्या खूनानंतर हेमराज गायब होता...
पण पुढच्या २४ तासात सर्वकाही बदललं. ज्या हेमराजवर आरूषीच्या खूनाचा संशय होता त्याचाच खून झालेला होता... पोलीसांची तपासाची चक्र फिरली आणि छताच्या दरवाजापर्यंत ते पोहचले. त्यांनी दाराचं कुलूप तोडंल आणि त्यांना आरूषीच्या इमारतीच्या छतावर हेमराज मृतदेह आढळून आला. विशेष म्हणजे आरूषी आणि हेमराजच्या खूनामध्ये फक्त १५ मिनिटांचं अंतर होतं... आरूषीच्या रूमपासून ते छतापर्यंत रक्ताचे डाग ठिकठिकाणी दिसून आले... घरातल्याच व्यक्तीने हे खून केले आहेत असे पुरावे सांगत होते. त्यामुळे पोलीसांवर निष्काळजीपणाचे गंभीर आरोप झाले..
First Published: Monday, November 25, 2013, 15:32