टाटा मोटर्सच्या `कार्ल स्लेम` यांचा अपघात की आत्महत्या,Tata Motors Karl Slym dies after hotel fall

टाटा मोटर्सच्या`कार्ल स्लेम`यांचा अपघात की आत्महत्या?

टाटा मोटर्सच्या`कार्ल स्लेम`यांचा अपघात की आत्महत्या?
www.24taas.com झी मीडिया

टाटा मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक कार्ल स्लेम यांनी आत्महत्या केली असावी , अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कार्ल स्लेम यांनी बँकॉक येथील एका हॉटेलाच्या २२व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली, असल्याचे स्थानिक वृत्तपत्राद्वारे समजते.

टाटा कंपनीकडून दिलेल्या माहितीनुसार, कार्ल स्लेम थायलंडच्या कंपनी कार्यालयात एका बोर्ड मिटींगसाठी गेले होते. कार्ल स्लेम आपल्या पत्नी समवेत बँकॉक येथील एका हॉटेलात २४ जानेवारीपासून राहत होते.

रविवारी ते भारतात परतणार होते. पण २२व्या मजल्यावरून पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.

२६ जानेवारी रोजी पोलीसांना सकाळी पाउणे आठ वाजता एका व्यक्तीने फोन करून कळवलं की, एका विदेशी व्यक्तीचा शंग्रीला हॉटेलवरून पडल्यामुळे मृत्यू झालेला आहे.पोलिसांना कार्ल स्लेम यांच्या हॉटेल रूममध्ये एक चिठ्ठी मिळाली आहे.

पोलीस चिठ्ठीची सत्यता तपासत आहेत. कार्ल यांच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात आले , त्यानंतर पोलिसांनी कार्ल यांचा मृतदेह त्यांच्या पत्नीकडे सोपवला.

टाटा समुहाचे अध्यक्ष सायरस मिस्त्री यांनी कार्ल यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे. कार्ल यांचा मृत्यू अपघाती आहे. आपण या दुःखात कार्ल याच्या कुटुंबासोबत आहोत, असं सायरस मिस्त्रींनी म्हटलंय.

कार्ल स्लेम हे टाटा कंपनीमध्ये २०१२ पासून कार्यरत होते. त्यांनी कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये बरेच बदल केले होते.

बाजारात मंदी असताना कार्ल टाटा कंपनीच्या यशासाठी प्रयत्न करीत होते. टाटामध्ये काम करण्यापूर्वी कार्ल हे जनरल मोटर्सचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक होते.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, January 27, 2014, 17:28


comments powered by Disqus