Last Updated: Wednesday, December 19, 2012, 07:57
www.24taas.com, नवी दिल्ली टाटा समूहातील कंपन्यांची मूळ कंपनी ‘टाटा सन्स’नं सायरस पी. मिस्त्री यांच्याकडे आपल्या अध्यक्षपदाचा भार सोपवलाय. मंगळवारी ही घोषणा केली गेलीय.
मिस्त्री यांची खरी परीक्षा सुरू होणार आहे ती २८ डिसेंबरपासून... कारण, ‘टाटा सन्स’चे सध्याचे अध्यक्ष रतन टाटा २८ डिसेंबर रोजी निवृत्त होत आहेत. ‘टाटा सन्स’च्या म्हणण्यानुसार, टाटा सन्सच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनं २८ डिसेंबर २०१२ रोजी सध्याचे चेअरमन रतन टाटा यांनी निवृत्ती स्वीकारल्यानंतर सायरस मिस्त्री हे पदभार स्वीकारतील. बोर्डानं टाटा यांना ‘चेअरमन एमिरेटस्’ म्हणून मानद दर्जा देण्याचा निर्णय घेतलाय.
मिस्त्री २००६ पासून टाटा सन्सच्या डायरेक्टरपदी कार्यरत आहेत. नोव्हेंर २०११ मध्ये त्यांची नियुक्ती उपाध्यक्ष (डेप्युटी चेअरमन) म्हणून करण्यात आली होती. या महिन्याच्या सुरुवातीलाच येत्या २८ डिसेंबरपासून मिस्त्री हेच ‘टाटा मोटर्स’चे अध्यक्ष असतील अशीही घोषणा करण्यात आली होती.
First Published: Wednesday, December 19, 2012, 07:55