Last Updated: Wednesday, October 24, 2012, 11:58
www.24taas.com, कोच्चीशाळेत मुलांचा टारगटपणा हा काही नवा विषय राहिलेला नाही. मात्र आता मुलांचा टारगटपणा हा निरागस राहिलेला नाही. कारण की आपल्या शिक्षकांचे वर्गात त्यांचे असे काही फोटो काढायचे आणि ते सोशल साईटवर टाकायचे हा नवाच उद्योग सुरू झाल्याने शिक्षक जरा जास्तच विचारात पडले आहेत. आणि त्यातही महिला शिक्षकानां याचा जास्तच त्रास होत असल्याचे समोर आले आहे.
केरळमध्ये ‘टारगट’ विद्यार्थ्यांच्या नजरांपासून वाचण्यासाठी शिक्षिकांना ओव्हरकोट किंवा ऍप्रॉन घालण्याची सक्ती करणारा फतवा केरळच्या खासगी शाळांच्या प्रशासनाने काढला आहे. शालेय प्रशासनाने वरील निर्णय शिक्षिकांच्या सतत वाढणार्या तक्रारीनंतर घेतला आहे. वर्गात शिकवताना काही टारगट मुले आपल्या मोबाईलमध्ये शिक्षिकांचे फोटो घेऊन ते सोशल साईटवर टाकत असल्याच्या तक्रारी शिक्षिकांनी शाळा प्रशासनाकडे केल्या होत्या.
या तक्रारींची खातरजमा करून शाळेने शिक्षिकांना ओव्हरकोट किंवा ऍप्रॉन घालूनच शाळेत या असे बजावले आहे. विद्यार्थ्यांना शाळेत मोबाईल आणण्यास बंदी केरळच्या सीबीएसई स्कूल बोर्डाचे अध्यक्ष इब्राहीम खान यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून विद्यार्थ्यांना शाळेत मोबाईल आणण्यावर बंदी घालण्यात आल्याचे सांगितले आहे
First Published: Wednesday, October 24, 2012, 11:51