Last Updated: Saturday, May 18, 2013, 12:05
www.24taas.com, झी मीडिया, हरियाणाहरियाणातील जिंद जिल्ह्यात एका अल्पवयीन विद्यार्थींनीसोबत बलात्काराची घटना समोर आली आहे. सरकारी शाळेतील शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थींनीवर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. माहितीनुसार असे कळते की, शिक्षकाने जवळजवळ दीड महिना विद्यार्थींनीवर बलात्कार केला. ही घटना समोर आल्यानंतर स्थानिकांना पोलीस स्टेशनवर मोर्चा नेला.
स्थानिकांनी तेथील पोलिसांनाही मारहाण केली. नववीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीवर या शिक्षकाने बळजबरी केली. त्यामुळे स्थानिकांनी आरोपी शिक्षकासोबत मुख्यधापकांना देखील चांगलाच चोप दिला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. अत्याचाराला बळी पडलेल्या पीडित मुलीने पोलिसांनी सांगितले की, २० एप्रिलला विज्ञान्याच्या शिक्षकांनी प्रयोगशाळेत बोलवून तिच्यासोबत छेडछाड केली.
पीडित मुलीला मारून टाकण्याची धमकी दिली. त्यामुळे ती फारच घाबरली. त्यानंतर शिक्षकाने तिला जबरदस्तीने कारमध्ये बसून एका पोल्ट्री फार्मवर नेलं. त्यानंतर प्रत्येक काही दिवसांनी घाबरून तिला पोल्ट्री फार्मवर नेऊन तिच्यावर बलात्कार करीत होता. शेवटी या सगळ्या गोष्टी असह्य झाल्याने पीडित मुलीने घरच्यांना या सगळ्याबाबत सांगितले.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, May 18, 2013, 11:54