Last Updated: Friday, September 27, 2013, 14:34
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्लीदोषी नेत्यांना वाचविण्यासाठी सरकारने काढलेल्या अध्यादेशाला फाडून फेकला पाहिजे, अशी सरकार विरोधी भूमिका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी घेऊन अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला. राहुल गांधीचा विरोध ही नौटंकी असल्याची प्रतिक्रिया भाजपने दिली आहे.
नवी दिल्लीच्या प्रेस क्लबमध्ये सरप्राइज पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी यांनी आपल्याला उशीरा आलेल्या शहाणपणाचा नमुना दाखवला. ते म्हणाले, या अध्यादेशाबाबत माझे वैयक्तिक मत आहे की, हा अत्यंत कुचकामी आहे. तो फाडून फेकला पाहिजे.
सरकारने अध्यादेश काढून चूक केली असल्याचे माझे मत आहे, असेही त्यांनी सांगितले.
काँग्रेसचे खासदार अजय माकनही या पत्रकार परिषदेत उपस्थित होते. त्यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याला पाठिंबा दिला आणि ही प्रतिक्रिया काँग्रेस पक्षाची आहे. या बाबत सरकारला त्यांचे मत सांगण्यात येईल.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, September 27, 2013, 14:34