अल्पवयीन मुलानं केला ६२ वर्षीय महिलेवर बलात्कारTeenage boy rape on 62 years old women in MP

अल्पवयीन मुलानं केला ६२ वर्षीय महिलेवर बलात्कार

अल्पवयीन मुलानं केला ६२ वर्षीय महिलेवर बलात्कार
www.24taas.com, वृत्तसंस्था, हरदा, मध्यप्रदेश

देशाची मान शरमेनं खाली घालणाऱ्या अनेक घटना सध्या दररोज आजुबाजुच्या परिसरात घडतांना दिसतायेत. मिळालेल्या माहितीनुसार एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलानं आपल्या आजीच्या वयाच्या असलेल्या ६२ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडलीय.

हरदा जिल्ह्यातील राहत गाव पोलीस स्टेशनच्या डोमरा गावात अल्पवयीन मुलानं ६२ वर्षीय महिलेवर बलात्कार केला. पोलिसांनी आज या घटनेची माहिती देत सदर घटना शनिवारी घडली असल्याचं सांगितलं आणि १७ वर्षीय मुलाला अटक केलीय.

वरिष्ठ पोलीस अधिकारी नारायण तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार एका वृद्ध महिलेनं आपल्याच गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलाविरोधात तक्रार केलीय. त्यानंतर महिलेची वैद्यकीय चाचणी करुन गुन्हा नोंदवण्यात आला. मुलानं वृद्धेच्या घरी जावून तिच्यावर बलात्कार केला. आरोपी मुलावर आयपीसी कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, January 12, 2014, 14:43


comments powered by Disqus