Last Updated: Tuesday, February 18, 2014, 16:39
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्लीसंसदेतल्या नाट्यमय घडामोडींनंतर वादग्रस्त तेलंगणा विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आलंय. गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सीमांध्रांला विशेष आर्थिक पॅकेज देण्याची घोषणा केली.
विधेयकावरून लोकसभेत अभूतपूर्व गोंधळ सुरू होता. त्यांमुळं लोकसभा अध्यक्षांनी लोकसभा टीव्हीचं प्रक्षेपण बंद करण्याचे आदेश दिलं. मात्र यावर विरोधकांनी आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली.
तर दुसरीकडे तेलंगणा विधेयकावरून लोकसभेत राडा करणा-या निंलबित खासदारांना माशर्ल्सनं सभागृहाबाहेरच रोखलं. त्यामुळं या ऐतिहासिक घटनेदरम्यान अभूतपूर्व अशी परिस्थिती लोकसभेत निर्माण झाली.
तेलंगणा राज्याच्या निर्मितीचे विधेयक केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज खेर मोठ्या गोंधळात लोकसभेत मांडलं.
या मुद्यावर आज संसदेत सुरुवातीपासूनच गदारोळ सुरू आहे. या गदारोळाच त्यांनी हे विधेयक लोकसभेत सादर केलं.
आता या विधेयकावर मतदान करण्याचे आव्हान काँग्रेसमोर आहे.
कारण तेलंगणाला आंध्रप्रदेशातल्या केंद्रीय मंत्र्यांसह काँग्रेस खासदारांचाही तीव्र विरोध आहे. त्यामुळं मतदान घेण्याचं अग्निदिव्य सरकारसमोर आहे.
या विधेयकाच्या बाजूने मतदान करण्यासाठी काँग्रेस पक्षानं आपल्या सदस्यांना व्हिप जारी केलाय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, February 18, 2014, 16:39