आंध्र प्रदेशचे विभाजन, तेलंगणा नवे राज्य, telangana separate state

आंध्र प्रदेशचे विभाजन, तेलंगणा नवे राज्य

आंध्र प्रदेशचे विभाजन, तेलंगणा नवे राज्य

www.24taas.com, वृत्तसंस्था, नवी दिल्ली

आंध्र प्रदेशचे विभाजन करून वेगळ्या तेलंगणा राज्याची निर्मिती करण्यासंबंधीच्या वादग्रस्त विधेयकाचा ठराव आज शुक्रवारी मंत्रिमंडळात मंजूर करण्यात आला. त्यामुळे नवे तेलंगणा राज्य अस्तित्वात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डी आणि मूळचे तेलंगणाचे नसलेले इतर काँग्रेस नेते यांचा तेलंगणाच्या निर्मितीला विरोध आहे.

केद्रीय मंत्रिमंडळाची तेलंगणा राज्य निर्मितीला मंजुरी मिळाल्यानंतर हे विधेयक राष्ट्रपतींकडे पाठविण्यात येईल, तसेच नंतर संसदेत सादर करण्यात येणार आहे. आंध्र प्रदेशच्या विभाजनाचा राजकीय फायदा मिळविण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी होणाऱ्या शेवटच्या संसदेच्या अधिवेशना होण्याआधी हे विधेयक मंजूर करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, February 7, 2014, 23:14


comments powered by Disqus