पाकिस्तानच दहशतवाद पसरवतोय- मुख्यमंत्री - Marathi News 24taas.com

पाकिस्तानच दहशतवाद पसरवतोय- मुख्यमंत्री

www.24taas.com, पुणे
 
देशाची आर्थिक स्थिती सुधारू नये यासाठी पाकिस्तान देशात दहशतवाद पसरवत असल्याचं मत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण  यांनी व्यक्त केलं आहे. पुण्यात 'ज्वालामुखी पाकिस्तान' या अनुवादित पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते.
 
दहशतवादी कृत्य करून लोकांमध्ये भीती पसरवून दंगली घडवण्याचा डाव असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. त्यामुळे आता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनीदेखील पाकिस्तानवर सरळ सरळ हल्लाबोल केला आहे. त्यामुळे आता केंद्रसरकार पाकिस्तानबाबत कोणतं धोरण अवलंबणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
 
तर दुसरीकडे पाकिस्तान मात्र दहशतवादाला समुळ नष्ट करण्यासाठी अजिबात उत्साही नसल्याचेच दिसून येत आहे. मुंबईवरील झालेला  २६/११चा हल्ला आणि त्याचा मास्टर माईंड सईद हाफिज याला अटक करण्यासाठी पुरावेच नाही त्यामुळे त्याला अटक करता येणार नाही, असं पाकिस्तान सरकारचं म्हणणं आहे.
 
 
 
 

First Published: Monday, May 14, 2012, 09:05


comments powered by Disqus