Last Updated: Monday, May 14, 2012, 13:26
www.24taas.com, नवी दिल्ली 
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या वादग्रस्त कार्टूनचं संपूर्ण पुस्तक मागं घेणार अशी घोषणा अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी केली आहे. या पुस्तकावरुन विरोधकांनी लोकसभेत आज पुन्हा गदारोळ घातला.
यावेळी विरोधकांनी घोषणाबाजी करत कार्टून छापणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. विरोधकांच्या गदारोळानंतर दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन देत मुखर्जी यांनी संपूर्ण पुस्तक मागं घेण्याची घोषणा केली आहे.
सीबीएसईच्या पुस्तकातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वादग्रस्त कार्टून हटवण्यात येणार असल्याचं आश्वासन सरकारनं दिले आहे. सीबीएसईच्या 11 वीच्या पुस्तकात आंबेडकरांच्या कार्टुनवरून संसदेच्या सभागृहात जोरदार गोंधळ झाला.
First Published: Monday, May 14, 2012, 13:26