ऑलिम्पिक-लंडनवारी - Marathi News 24taas.com

ऑलिम्पिक-लंडनवारी


 
 
------------------------------

 
 
 
 
 
 
 

भारताला लंडन ऑलिम्पिकमध्ये पहिले पदक भारतीय शुटर गगन नारंग याने मिळवून दिले आहे. आपल्या


अचूक वेध साधण्याच्या कामगिरीने गगनने ऑलिम्पिकमध्ये पहिले ब्राँझ पटकावले आहे. आपणही या


धुरंधर खेळाडूला शुभेच्छा द्या.... शुभेच्छा देण्यासाठी खालील मांडा रोखठोक मत या प्रतिक्रियांच्या


बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंदवू शकतात..... 



----



बोल्टने गोल्ड मिळवलं वेगात…



बोल्टने गोल्ड मिळवलं वेगात…
लायटनिंग ऊसैन बोल्ट जगातला सर्वात वेगवान मानव ठरला आहे... वाऱ्याशीही स्पर्धा करणारा ऊसैन बोल्टने पुन्हा एकदा नवा इतिहास रचला आहे. आणि आता हा विश्वविक्रम त्याने पुन्हा एकदा स्वत:चाच रेकॉर्ड मोडून रचला आहे.




----


सायना पुढे, पेस आता घरी परतणार…



सायना पुढे, पेस आता घरी परतणार…
सायना नेहवालने प्री क्वार्टर राऊंडमध्ये नेदरलँडच्या याओ जीचा पराभव करत क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केलाय... सायनाने 21-14, 21-16 ने आरामात ही मॅच जिंकली.


----


तरूणींनी लंडन ऑलिम्पिकमध्ये ‘जिंकून दाखवलं’



तरूणींनी लंडन ऑलिम्पिकमध्ये ‘जिंकून दाखवलं’
विधानपरिषेदवर बिनविरोध निवडून गेलेले आमदार हे हायकंमाडला किती मानतात याचा नमुना पुन्हा एकदा पाहायला मिळाला आहे. काँग्रेस आमदार संजय दत्त यांनी लाळघोटेपणाची हद्दही पार केली.


 
----  
 
भारताला पहिलं पदक, गगनने पटकावलं ब्राँन्झ

भारताला पहिलं पदक, गगनने पटकावलं ब्राँन्झ
भारताचाच नेमबाज गगन नारंग याने लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलंवहिलं

पदक मिळवून दिलं आहे. १० मी. पुरूष एअर रायफल शूटींग स्पर्धेत गगन नारंगने

तिसरे स्थान पटकावित कास्य पदकाला गवसणी घातली आहे.


 
----
 
ऑलिम्पिकमध्ये भारताचा पहिला दिवस

ऑलिम्पिकमध्ये भारताचा पहिला दिवस
बॅडमिंटनच्या मिक्स डबल्सच्या पहिल्याच राऊंडमध्ये ज्वाला गुट्टा आणि व्ही. दिजूला

पराभवाचा धक्का सहन करावा लगाला अन् ऑलिम्पिकमध्ये भारताची सुरुवातच पराभवानं

झाली. बॉक्सिंगमध्येही भारताची सुरूवात निराशाजनक झाली शिव थापाचं आव्हान पहिल्याच

राऊंडमध्ये संपुष्टात आलं, विजेंदरनं मात्र मजबूत दावेदारी प्रस्थापित केलीय.


----  

लंडन ऑलिम्पिकमध्ये… ‘ही पोरगी कोणाची?’

लंडन ऑलिम्पिकमध्ये… ‘ही पोरगी कोणाची?’
ऑलिम्पीक सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी भारतीय दलात एक अज्ञात महिला आढळून आल्याचं

प्रकरण समोर आलं आहे. भारतीय ऑलिम्पिक संघाने या बाबतची तक्रार आयोजन समितीला केलेली आहे.


----  

लंडन ऑलिम्पिक : डोंग ह्युनची विजयी सलामी

लंडन ऑलिम्पिक : डोंग ह्युनची विजयी सलामी
लंडन ऑलिम्पिक २०१२ मध्ये दक्षिण कोरियाच्या डोंग ह्युननं लंडन ऑलिम्पिकमध्ये पहिल्या वर्ल्ड

रेकॉर्डची नोंद केलीय.

............................

----  


‘ऑलिम्पिक’मध्ये भारताची सुरूवात पराभवाने

‘ऑलिम्पिक’मध्ये भारताची सुरूवात पराभवाने
ऑलिम्पिकमध्ये भारताची सुरुवात परभवानं झाली आहे. बॅडमिंटनच्या मिक्स डबल्सच्या

पहिल्याच राऊंडमध्ये ज्वाला गुट्टा आणि व्ही. दिजूला पराभवाचा धक्का सहन करावा लागला

आहे. इंडोनेशियाच्या अहमद आणि नातसिरल जोडीनं ज्वाला-दिजूचा 21-16, 21-12 अशी

सरळ दोन गेममध्ये पराभव केला.


----  

ऑलिम्पिकमध्ये भारताची सलामी…ऑलिम्पिकमध्ये भारताची सलामी…

लंडन ऑलिम्पिक हे भारतीयांसाठी आत्तापर्यंतचं सर्वात महत्त्वाचं ऑलिम्पिक आहे. यंदा

भारताचे तब्बल ८३ खेळाडू देशाला मेडल मिळवण्यास झुंज देताना दिसतील.


---- 




२०४ देशांचा सहभाग... १० हजार अॅथलिट्स... २६ खेळ... ३०२ क्रीडाप्रकार आणि एक नाव...

अर्थातच ऑलिम्पिक.


----

.

.ऑलिम्पिक : भारतीय तिरंदाजीचे दिसणार जलवे



ऑलिम्पिक : भारतीय तिरंदाजीचे दिसणार जलवे
लंडन ऑलिम्पिकमध्ये आज भारताला पहिल्याच दिवशी तिरंदाज स्पर्धक आपले जलवे दाखवू

शकतील. त्यामुळे आजचा शुक्रवार भारतासाठी मेडलचा असेल. भारताच्या तिरंजाद टीमकडून पदकाची आशा आहे.


---- 


लंडन ऑलिम्पिक: घुमणार रेहमानचे सूर

लंडन ऑलिम्पिक: घुमणार रेहमानचे सूर
सर्वांनाच वेध लागतेल ते लंडन ऑलिम्पिकचे... या ऑलिम्पिकमध्ये फक्त भारतीय खेळाडूच नाही

तर भारतीय कलाकारही आपलं कौशल्य दाखवण्यास सज्ज झालेत. जगविख्यात ए. आर. रेहमानच्या

गाण्यानेच ऑलिम्पिकची सुरवात होणार असून या ऑलिम्किचं भारतीय कनेक्शन कसं असणार

याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचलेली दिसून येतंय.


---- 


उत्सुकता लंडन ऑलिम्पिकच्या उद्घाटनाची

उत्सुकता लंडन ऑलिम्पिकच्या उद्घाटनाची
लंडननगरी ऑलिम्पिकसाठी सज्ज झालीय. ३० व्या ऑलिम्पिक खेळांना आजपासून लंडनमध्ये सुरुवात

होतेय. भारतीय वेळेनुसार रात्री दीड वाजता या सोहळ्याला सुरुवात होणार आहे आणि तो पहाटेपर्यंत

सुरू असेल. आता साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत त्या लंडन ऑलिम्पिकच्या रंगतदार ओपनिंग सेरेमनीवर...


----




बिग बीच्या हाती ऑलिम्पिकची मशाल

बिग बीच्या हाती ऑलिम्पिकची मशाल
बॉलिवूडचा महानायक बिग बी अमिताभ बच्चन लंडनमधील ऑलिम्पिक स्पर्धेत ज्योत घेऊन धावणार

आहे. लंडनमध्ये लिम्पिक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ज्योत रिले स्पर्धेचे उद्या आयोजन करण्यात आले

आहे. या रिलेत भाग घेण्याचा मान बिग बीला देण्यात आला आहे.


----




कलमाडींना ऑलिंपिक उद्घाटनास जाण्यास मज्जाव

कलमाडींना ऑलिंपिक उद्घाटनास जाण्यास मज्जाव
कलमाडींच्या लंडनवारीला दिल्ली हायकोर्टानं मनाई केली आहे. कलमाडींची ऑलिम्पिकच्या उदघाटन

सोहळ्याला हजेरी म्हणजे देशासाठी शरमेची बाब होईल, असं कोर्टानं म्हंटलंय. देशाचं हित लक्षात घेत

हा निर्णय दिल्याचं कोर्टानं स्पष्ट केलंय.



----





मायकल फेल्प्स : ऑल टाईम ग्रेट

मायकल फेल्प्स : ऑल टाईम ग्रेट
ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेचा स्टार स्विमर मायकल फेल्प्स क्रीडाप्रेमींसाठी सेन्टर ऑफ अॅट्रॅक्शन ठरणा

र आहे. २००८ बिजिंग ऑलिम्पिकमध्ये त्यानं स्विमिंगच्या आठ इव्हेंट्समध्ये गोल्ड मेडल पटकावत

नवा इतिहास रचला होता. आता २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये त्याच्यासमोर बीजिंग ऑलिम्पिकची

पुनरावृत्ती करण्याचं आव्हान असणार आहे.



----



सुशीलकुमार भारताचा फ्लॅग बेअरर

सुशीलकुमार भारताचा फ्लॅग बेअरर
लंडन ऑलिम्पिकमध्ये अव्वल कुस्तीपटू सुशील कुमारला भारताचा फ्लॅग बेअरर बनण्याचा मान मिळाला

आहे. सुशीलनं २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी ब्राँझ मेडलची कमाई केली होती.

आणि त्यामुळेच त्याला भारतीय टीमचा फ्लॅग बेअरर होण्याचा मान मिळाला आहे. गेल्या काही

दिवसांपासून अनेक नावांची चर्चा झाली होती. आणि अखेर सुशील कुमारच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.





सानिया मिर्झाकडूनही भारताला मेडल्सच्या अपेक्षा आहे. लंडनमध्ये ती वुमेन्स डबल्स आणि मिक्स

डबल्समध्ये मेडलची दावेदार आहे.सानियाचा जलवा लंडनमध्ये चालला तर भारताला अजून ऑलिम्पिक

मेडलही पक्क होईल.




----






मी ऑलिम्पिकला जाणार म्हणजे जाणार- कलमाडी

मी ऑलिम्पिकला जाणार म्हणजे जाणार- कलमाडी
पंतप्रधानांनी केंद्रीय क्रीडा मंत्री अजय माकन यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी सुरेश कलमाडींनी

केली आहे. माकन यांच्या वक्तव्यानं धक्का बसल्याचंही कलमा़डींनी म्हटलं आहे.




----

कलमाडींच्या ऑलिम्पिकवारीला क्रीडामंत्र्यांचा ब्रेक







कलमाडींच्या ऑलिम्पिकवारीला क्रीडामंत्र्यांचा ब्रेक
इंडियन ऑलिम्पिकचे माजी अध्यक्ष सुरेश कलमाडी यांना ऑलिम्पिकचं निमंत्रण कोणी दिलं, याबाबत

केंद्रीय क्रीडामंत्री अजय माकन यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. कलमाडी हे भारतीय डेलिगेशनचा

हिस्सा असू शकत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.




----






कलमाडी जाणार ‘ऑलिम्पिक’ला…

कलमाडी जाणार ‘ऑलिम्पिक’ला…
सुरेश कलमाडी आता ऑलिम्पिकच्या मैदानात दिसणार आहेत. कारण आता त्यांना भारताबाहेर

जाण्याची परवानगी मिळालीय. दिल्ली कोर्टानं ही परवानगी दिलीय.




----


ऑलिम्पिक ‘गाव’… रासलीला चाललीये ‘राव’






ऑलिम्पिक ‘गाव’… रासलीला चाललीये ‘राव’
ऑलिम्पिक म्हणजे खेळांचा कुंभमेळाच... आणि याच कुंभमेळात अनेकजण हरवूनही जातात...

अहो इतर कुठे दुसरीकडे नाही तर एका वेगळ्याच खेळामध्ये...एकीकडे ऑलिम्पिकमध्ये महत्त्वाचे

खेळ सुरू असताना खेळाडू त्यांचे वेगळेच खेळ खेळत असतात.




----






सानिया मिर्झाच्या आईला ऑलिम्पिकचं तिकीट!

सानिया मिर्झाच्या आईला ऑलिम्पिकचं तिकीट!
ऑल इंडिया टेनिस असोसिएशननं अजून एक नवा वाद निर्माण केला आहे. सानिया मिर्झाच्या आईला

टेनिस फेडेरेशननं ऑलिम्पिक टेनिस टीमच्या सपोर्ट स्टाफमध्ये सहभागी केल्यामुळेच एका नव्या

वादाला तोंड फुटलं आहे.




----

ऑलिम्पिकमध्ये ११ शूटर्स घेणार सुवर्णवेध







ऑलिम्पिकमध्ये ११ शूटर्स घेणार सुवर्णवेध
लंडनमध्ये भारताला सर्वाधिक अपेक्षा असणार ते शुटिंगमध्ये... अथेन्समध्ये राज्यवर्धन सिंग राठोड

आणि बीजिंगमध्ये अभिनव बिद्रानं मेडल पटकावलेय. आता लंडनमध्ये तब्बल ११ शूटर्स सुवर्णवेध

घेण्यासाठी सज्ज आहेत.




----

लंडन ऑलिम्पिक : भारतीय बॉक्सर्स सज्ज







लंडन ऑलिम्पिक : भारतीय बॉक्सर्स सज्ज
बीजिंगमध्ये विजेंदरनं मेडल मिळवल्यानंतर भारतीय बॉक्सर्सनी मोठी झेप घेतली आहे. मेरी कोमसह

भारताचे सात बॉक्सर्स लंडनमध्ये तिरंगा फडकवण्यासाठी आतूर आहे.




----






ऑलिम्पिक आणि डर्टी बॉम्ब

ऑलिम्पिक आणि डर्टी बॉम्ब
लंडनवर हल्ला करून जगभरात दहशत निर्माण करण्याचा दहशतवादी संघटनांचा इरादा आहे....

त्यामुळे लंडनमध्ये संपूर्ण लंडनमध्ये हाय अलर्टवर आहे.. ऑलिम्पिकच्या सुरळीत पार करण्यासाठी

सुरक्षा यंत्रणाही सज्ज झाल्यात..




----

ऑलिम्पिकमध्ये धावणार ‘ब्लेड रनर’







ऑलिम्पिकमध्ये धावणार ‘ब्लेड रनर’
दुर्दैम्य इच्छाशक्ती आणि जिद्दीच्या जोरवर माणूस किती मोठी झेप घेवू शकतो हे दाखवून दिलंय

दक्षिण आफ्रिकेचा अथलिट ऑस्कर पिस्टोरियसनं... दोन्ही पाय नसलेल्या ऑस्करनं कृत्रिम पायांच्या

मदतीनं ऑलिम्पिकमध्ये धावण्याचं स्पप्न पूर्ण होणार आहे...




----






ब्रिटनमध्ये सहा संशयीत दहशतवाद्यांना अटक

ब्रिटनमध्ये सहा संशयीत दहशतवाद्यांना अटक
लंडन ऑलिम्पिकचा बिगुल वाजायला आता काहीच दिवस शिल्लक असताना ब्रिटीश पोलिसांनी

गुरूवारी सहा जणांना संशयित दहशतवादी म्हणून अटक केली आहे. यात एका महिलेचाही समावेश आहे.




----






पेस विष्णुबरोबर ऑलिम्पिक खेळण्यास तयार

पेस विष्णुबरोबर ऑलिम्पिक खेळण्यास तयार
ऑलिंपिकमध्ये लिएंडर पेस खेळणार की नाही? याबाबत अनेक शक्यता वर्तवल्या जात होत्या. मात्र,

पेसनं लंडन ऑलिंपिकमध्ये खेळणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.




----






विम्बल्डनची धमाल: भूपती-बोपन्नाची कमाल

विम्बल्डनची धमाल: भूपती-बोपन्नाची कमाल
मेन्स डबल्समध्ये सातवी सीडेड महेश भूपती आणि रोहन बोपन्ना या भारतीय जोडीनं विम्बल्डन्सच्या

दुसऱ्या राऊंडमध्ये दिमाखात प्रवेश केलाय.




----


ऑलिम्पिकला अलकायदाचा धोका






ऑलिम्पिकला अलकायदाचा धोका
अवघ्या महिन्यावर येऊन ठेपलेल्या खेळांच्या कुंभमेळा असलेल्या लंडन ऑलिम्पिकला अल कायदापासून

धोका असल्याचा इशारा इंग्लंडची गुप्तहेर संघटना ‘एमआय - ५’ने दिला आहे. पाकिस्तान आणि

अफगाणिस्तानात असलेल्या जिहादींचा अरब मध्य-पूर्वेतील जगतामध्येही शिरकाव झाला असल्याने ही अत्यंत काळजीची

बाब असल्याचे ‘एमआय-५’चे महासंचालक जोनाथन इव्हान्स यांनी सांगितले.




----






ऑलिम्पिकमध्ये भारताचे ५ बॅडमिंटनपटू भिडणार

ऑलिम्पिकमध्ये भारताचे ५ बॅडमिंटनपटू भिडणार
लंडनमध्ये शूटिंग, बॉक्सिंगशिवाय बॅडमिटनमध्येही भारताला मेडल्स अपेक्षा असणार. जबरदस्त फॉर्मात

असलेली सायना नेहवाल, पी.कश्यप मेडल्ससाठी प्रबळ दावेदार आहेत. तर ग्लॅमरस ज्वाला गुट्टाही

अश्विन पोनप्पा आणि व्ही. दिजूसह जलवा दाखवण्याची क्षमता ठेवते.




----






वेध लंडन ऑलिम्पिकचे…

वेध लंडन ऑलिम्पिकचे…
ऑलिम्पिकला उरलाय केवळ एक महिना... १३ गेम्समध्ये भारताची दावेदारी... मेडल्ससाठी झुंजणार

तब्बल ८१ भारतीय प्लेअर्स ... लंडन ऑलिम्पिकचं काऊंटडाऊन सुरु झालंय...




----






अखेर पेसची लंडन ऑलिंपिकमधून माघार!

अखेर पेसची लंडन ऑलिंपिकमधून माघार!
टेनिसमध्ये मानापमानची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही आहे. कमी रँकिंग असलेला जोडीदार दिल्याने

टेनिसपटू लिअँडर पेसने लंडन ऑलिम्पिकमधून माघार घेतली आहे. ऑल इंडिया टेनिस फेडरेशनने घेतलेल्या

निर्णयावर नाराज होत पेसने हा निर्णय घेतला आहे.

----



AITAचा निर्णय : पेस-भूपती जाणार, पण वेगवेगळे

AITAचा निर्णय : पेस-भूपती जाणार, पण वेगवेगळे
ऑलिम्पिसाठी मेन्स डबल्स दोन टीम पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. पेसची जोडी युवा विष्णू वर्धनसोबत

करण्यात आली आहे. तर डबल्समधील दुसरी जोडी असणार आहे ते भूपती आणि बोपन्ना यांची दुसरी जोडी

ऑलिम्पिकसाठी जाणार आहे.




----






पेस विरुद्ध भूपती-बोपन्ना वादाचा आज फैसला

पेस विरुद्ध भूपती-बोपन्ना वादाचा आज फैसला
भारतीय टेनिस टीमची आज घोषणा करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पेस विरुद्ध भूपती-बोपन्ना वादाचा फैसला आज होण्याची शक्यता आहे.





























 
 
बोपन्नाचाही पेससोबत खेळण्यास इन्कार

बोपन्नाचाही पेससोबत खेळण्यास इन्कार
भारतीय टेनिस स्टार महेश भूपतीनंतर आता रोहन बोपन्ना यानेही लंडन ऑलिंपिकमध्ये लिएंडर पेस सोबत खेळण्यास नकार दिला आहे. या संदर्भात त्याने अखिल भारतीय टेनिस संघाच्या अधिकाऱ्यांना कळविले आहे.


----


लिएंडर पेसला रोहन बोपन्नची साथ

लिएंडर पेसला रोहन बोपन्नची साथ
लंडन ऑलिंपिकमध्ये लिएंडर पेसबरोबर खेळण्यास महेश भूपतीनं नकार दिला आहे. त्याच्या नाराजीनंतर भारतीय टेनिस महासंघानं आता लिएंडर पेसबरोबर भूपती न गेल्यास रोहन बोपन्न लंडनला जाईल असा निर्णय घेतला आहे.


----


पेसने माझ्या पाठीत खंजीर खुपसला- भूपती

पेसने माझ्या पाठीत खंजीर खुपसला- भूपती
लिएंडर पेस आणि महेश भूपती या भारताच्या ऑल टाईम ग्रेट टेनिस जोडीनं लंडन ऑलिंपिकमध्ये एकत्र खेळावं असा निर्णय भारतीय टेनिस महासंघानं घेतला आहे. मात्र, भूपती पेसबरोबर खेळण्यास तयार नाही. 'पेसने माझ्या पाठीत खंजीर खुपसला आहे'.


----


भारतीय शूटर्सचा अपमान, हॉटेल बाहेर काढलं

भारतीय शूटर्सचा अपमान, हॉटेल बाहेर काढलं
भारतीय शूटर्सचा लंडनमध्ये अपमान करण्यात आला. भारताचे शूटर्स लंडनमध्ये ऑलिंपिक टेस्ट इव्हेंटसाठी सहभागी झाले होते. मात्र या इव्हेंटनंतर भारतीय शूटर्सचा अनुभव अतिशय क्लेषदायक ठरला.


----


आणि ते शेवटचे १०० दिवस…..

आणि ते शेवटचे १०० दिवस…..
लंडन ऑलिंपिकच्या कांऊंटडाऊनला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आहे. ऑलिंपिक सुरु होण्यास १०० दिवस राहिले आहेत. आणि सपूर्ण लंडन शहरावर ऑलिंपिकच्या रंगात रंगू लागला आहे. फक्त १०० दिवसांवर लंडन ड्रीम्स येऊन ठेपलं आहे.


----





 
 
 
.
 
 
 

First Published: Monday, August 6, 2012, 13:54


comments powered by Disqus