बातमी मस्त पेट्रोल स्वस्त - Marathi News 24taas.com

बातमी मस्त पेट्रोल स्वस्त

झी २४ तास बेव टीम, मुंबई
 
आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमतीत घट झाल्याने आज मध्यरात्री पासून पेट्रोलच्या किंमतीत प्रति लिटर ७८ पैशांनी कपात करण्यात आली आहे. तेल कंपन्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महिनाभरात दुसऱ्यांदा पेट्रोलच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. मुंबईत पेट्रोल प्रति लिटर ७०. ६९ रुपये प्रतिलिटर मिळेल.
 
या आधी तेल कंपन्यांनी १६ नोव्हेंबर रोजी पेट्रोलच्या किंमतीत प्रति लिटर २.२२ रुपये प्रति लीटर कपात केली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात नोव्हेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात कच्च्या तेलाच्या किंमती प्रति बॅरल १०७ डॉलर पर्यंत खाली घसरल्या.
 
कच्च्या तेलाच्या किंमती नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ११५.८५ डॉलर प्रति बॅरल होत्या.  आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण झाली असली तरी रुपया डॉलरच्या तुलनेत कमकुवत झाल्याने त्याचा त्या तुलनेत पेट्रोलच्या किंमतीवर झाला नाही.  नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मुल्य ४९.३० रुपये प्रति डॉलर होते.
 

First Published: Wednesday, November 30, 2011, 15:05


comments powered by Disqus