एअर इंडिया हवेत, संप काही मिटेना - Marathi News 24taas.com

एअर इंडिया हवेत, संप काही मिटेना

www.24taas.com,  नवी दिल्ली
 
एअर इंडियाच्या वैमानिकांचा संप मंगळवारी आठव्या दिवशीही सुरूच आहे. या संपामुळे १० आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. संपकरी आणि व्यवस्थापनात बोलणी होत नसल्याने संप सुरूच आहे. दरम्यान, केद्र सरकराने लक्ष देऊनही संपकरी वैमानिक आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने आठव्या दिवशीही प्रवाशांनी याचा त्रास सहन करावा लागत आहे.
 
 
मुंबई आणि दिल्ली विमानतळावरील तब्बल १० आंतरराष्ट्रीय उड्डाणे आज रद्द करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून एअर इंडियाची दररोज २० ते ३० उड्डाणे रद्द करण्यात येत आहेत. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोईला सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भात एअर इंडियाचा प्रवक्ता म्हणाला, की सध्याच्या परिस्थितीत दिल्ली-टोरोंटो आणि दिल्ली-न्यूयॉर्क या रुटवरील उड्डाणे पूर्ववत करण्यात आली आहेत. आज रात्रीपासून या रुटवर आणखी उड्डाणे सुरू केली जातील, असे सांगण्यात आले आहे.
 
 

एअर इंडियाच्या जवळ-जवळ २०० वैमानिकांनी संप पुकारला आहे.  दरम्यान याप्रकरणी वैमानिकांनी जर आजारी असल्याचे खो़टे नाटक करुन कामावर दांडी मारली असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे, डीजीसीएने म्हटले आहे.  एअर इंडियाची मुंबई आणि दिल्ली विमानतळावरील १० आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आल्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.
 

First Published: Tuesday, May 15, 2012, 15:19


comments powered by Disqus