Last Updated: Tuesday, May 15, 2012, 18:37
www.24taas.com, नवी दिल्ली स्पॉट फिक्सिंग प्रकरणात ५ क्रिकेटपटुंना निलंबित करण्यात आलंय. बीसीसीआयनं ही कारवाई केलीय.
अभिनव बाली, टी. पी. सुधींद्र, मोहनिश मिश्रा, शालब श्रीवास्तव आणि अंकित यादव यांना फिक्सिंगच्या आरोपाखाली १५ दिवसांसाठी निलंबित केलं गेलंय. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी बीसीसीआयनं एक समिती नेमलीय. रवी सवानी या समितीच्या अध्यक्षपदी असतील.
एका टिव्ही चॅनेलने स्टिंग ऑपरेशन करून काही खेळाडूंना छुप्या कॅमेऱ्यात कैद केलं होतं. यामध्ये काही खेळाडूंनी पैसे घेताना पकडले गेलं होतं. यामध्ये स्पॉट फिक्सिंगचाही समावेश आहे. तर जास्त पैसे कमविण्यासाठी काही प्रथम श्रेणीचे सामने फिक्स केले गेले होते. या फिक्सिंगमध्ये महिलांची महत्वाची भूमिका ठरत असल्याचा दावा या टीव्ही चॅनेलनं केला होता.
First Published: Tuesday, May 15, 2012, 18:37