Last Updated: Wednesday, May 16, 2012, 19:48
www.24taas.com, नवी दिल्ली मंगळवारी अभिनेत्री रेखा यांनी राज्यसभेत खासदारकीची शपथ घेतली. यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी जया बच्चन यांनी राज्यसभेचे सभापती हमीद अन्सारी यांच्याकडे तक्रार केलीय. ही तक्रार रेखाबद्दल नव्हती बरं का! तर ही तक्रार होती राज्यसभा टीव्हीविरोधात...
अभिनेत्री रेखा यांच्या खासदारकीच्या शपथविधी दरम्यान जया बच्चन यांच्यावर कॅमेरा रोखण्यात आल्यानं त्या नाराज झाल्या आहेत. त्यांनी राज्यसभा टीव्ही विरोधात हमीद अन्सारी यांच्याकडे तक्रार दाखल केलीय. त्यामुळं जया आणि रेखा यांच्या राज्यसभेतल्या सिलसिल्याला सुरूवात झाल्याचं चित्र दिसतंय.
यापूर्वी, योगायोगानं रेखा यांना जया बच्चन यांच्या जवळच आसन मिळाळं होतं. पण, ही गोष्ट जयांच्या लक्षात आल्यावर त्यांनी आपला आसन क्रमांक बदलून घेतला होता. रेखा यांना राज्यसभेत ९९ क्रमांकाची जागा देण्यात आली होती. ही जागा जया बच्चन यांच्या मागे होती. म्हणजे पुढील रांगेत ९१ आणि मागील रांगेत ९९ अशी आसन व्यवस्था होती. त्यामुळे जया बच्चन यांनी रेखा यांच्याशी आमना-सामना टाळण्यासाठी आपला आसन क्रमांक ९१ वरून १४३ करून घेतला होता. त्यामुळे जोरदार चर्चा रंगली होती. आता रेखा यांच्या शपथविधी दरम्यान जया यांच्यावर कॅमेरा रोखल्यानं त्यांनी थेट तक्रार केलीय.
First Published: Wednesday, May 16, 2012, 19:48