खबरदार! तासनतास बसून राहाल तरं... - Marathi News 24taas.com

खबरदार! तासनतास बसून राहाल तरं...

www.24taas.com, लंडन
 
ऑफिसमध्ये तासनतास बसून काम करून परत घरी जाऊन टीव्हीसमोर बसत असाल तर सावधान! या सवयी तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात.
 
लंडनस्थित ‘लाईफब्लड’ या संस्थेने केलेल्या सर्व्हेमध्ये काही धक्कादायक निष्कर्ष हाती आलेले आहेत. ‘लाईफब्लड’च्या म्हणण्यानुसार एका ठिकाणी तासनतास बसून काम करणाऱ्या युवकांच्या शरिरात रक्त गोठण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. ही प्रकिया जीवासाठी धोकादायक आहे. कामाच्या टेंशनमध्ये एकाच जागी सतत तीन तास बसून राहणं, आपल्या जागेवर बसूनच जेवण करणं आणि परत घरी जाऊन सोफ्यावर टीव्हीसमोर बसणं या जीवघेण्या सवयी रक्त गोठवण्याच्या प्रकियेला हातभार लावतात, असं लाईफब्लडनं म्हटलंय.
 
डेली टेलीग्राफनंही या निष्कर्षाला दुजोरा दिलाय. तासनंतास बसून राहणाऱ्या व्यक्तींना रक्त गोठल्यामुळे ‘डीप वेन थ्रॉमबोसिस’ नावाच्या रोगाला सामोरं जायला लागू शकतं, असं डेली टेलीग्राफनं म्हटलंय.

First Published: Thursday, May 17, 2012, 15:00


comments powered by Disqus