इशरत हत्येचा तपास सीबीआयकडे! - Marathi News 24taas.com

इशरत हत्येचा तपास सीबीआयकडे!

झी २४ तास वेब टीम, अहमदाबाद
इशरत जहाँ हत्येप्रकरणी तपासाची जबाबादारी गुजरात पोलिसांकडून काढून घेऊन सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय गुजरात हायकोर्टाने घेतला आहे. हायकोर्टाचा हा निर्णय म्हणजे नरेंद्र मोदी सरकारला मोठा धक्का असल्याचे मत राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
इशरत केसच्या तपासात गुजरात पोलिसांवर विश्वास ठेवणे अवघड असल्यामुळे तपास पोलिसांऐवजी सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश देत असल्याचे हायकोर्टाने सांगितले. कोर्टाने एसआयटीला इशरत प्रकरणात नव्याने तक्रार  नोंदवण्याचा आदेश दिला.
इशरतची बनावट चकमकीत हत्या करण्यात आल्याचा आरोप करत तिच्या कुटुंबियांनी तपास सीबीआयमार्फतच व्हावा, अशी मागणी केली होती. ही मागणी हायकोर्टाने मान्य केली.
याआधी इशरत ही दहशतवाद्यांची सहकारी होती आणि पोलीस चकमकीत मारली गेली, असा दावा गुजरात पोलीस करत होते. हा दावा बनावट असल्याचे एसआयटीच्या तपासात उघड झाले. या पार्श्वभूमीवर इशरत जहाँ हत्येप्रकरणी तपासाची जबाबादारी सीबीआयकडे सोपवण्यात आली आहे.

First Published: Thursday, December 1, 2011, 12:54


comments powered by Disqus