मराठमोळे मावळे एव्हरेस्टवर - Marathi News 24taas.com

मराठमोळे मावळे एव्हरेस्टवर

 www.24taa.com, नवी दिल्ली
 
काही दिवसांपूर्वी हिमालय सर करण्यासाठी निघालेले मराठमोळे मावळे अत्युच्च शिखर एव्हरेस्टजवळ पोहचलेत. त्यापैकी दोघांनी एव्हरेस्टवर पाऊल ठेवले आहे. त्यांनी भगवा झेंडा एव्हरेस्टवर फडकविला आहे.
 
कोणत्याही क्षणी  १० मराठमोळे मावळे  एव्हरेस्टवर झेंडा फ़डकवतील. अखंड महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. देशातली सर्वात मोठी नागरी मोहीम अशीही या एव्हरेस्टवारीची ओळख आहे. एकाचवेळी 12 गिर्यारोहक या मोहिमेत सहभागी झालेत.
 
पुण्याच्या 'गिरिप्रेमी' संस्थेच्या मिशन 'एव्हरेस्ट 2012' ला य़श मिळाले आहे. नेपाळ वेळेप्रमाणे आज सकाळी 9.15 ला एव्हरेस्ट शिखरावर पहिले पाऊल टाकले. . मोहिमेतील कृष्णा ढोकळे व टेकराज अधिकारी या दोघा गिर्यारोहकांची नेपाळमार्गे एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केली.
 
व्हिडिओ  पाहा...

First Published: Saturday, May 19, 2012, 10:17


comments powered by Disqus