Last Updated: Saturday, May 19, 2012, 11:37
www.24taas.com, नवी दिल्ली रॉयल बंगळुरु चॅलेंजर्सचा मालक विजय माल्ल्यांचा मुलगा सिद्धार्थ माल्ल्या आता वादात सापडला आहे. आरोप करणाऱ्या महिलेच्या चारित्र्य़ावर संशय घेतल्याप्रकरणी त्याच्यावर अब्रु नुकसानीची नोटीस बजावण्यात आली आहे.
अमेरिकन महिलेच्या छेडछाडप्रकरणी ल्युक पॉमर्सबॅचची पाठराखण करताना सिद्धार्थनं त्या अमेरिकन महिलेच्या चारित्र्यावरच टीका केली होती. आता या अमेरिकन महिलेनं सिद्धार्थ माल्ल्याला अब्रु नुकसानीची नोटीस बजावलीय. त्यामुळे सिद्धार्थ माल्ल्या चांगलाच अडचणीत आला आहे. या नोटीसनंतर सिद्धार्थ माल्ल्या काय होणार, याचीच चर्चा सुरू आहे.
अमेरिकन महिला जोहल हिनं तिच्या वकिला मार्फत ही नोटीस पाठवलीय. तसंच ती याप्रकरणी महिला आयोगाकडेही तक्रार करणार आहे. आयपीएलमध्ये सध्या फारच वाईट गोष्टी घडत आहे. काल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या पार्टीत ल्यूक पॉमर्सबॅचने महिलेची काढलेली छेड आणि त्यानंतर झालेली अटक यामुळे हा विषय चांगलाच गाजत आहे. रॉयल चॅलेंजर्सचा ओनर विजय मल्ल्याचा मुलगा सिद्धार्थ माल्ल्याने आरोप केला आहे की, आरोप करणाऱ्या महिलेच्या चारित्र्य़ावर संशय घेतला आहे.
सिद्धार्थने टि्वटरवर टि्वट केल आहे की, जी मुलगी ल्यूकवर आरोप करते आहे की, माझ्या बॉयफ्रेंडला मारहाण केली, हे सगळे आरोप खोटे आहेत. काल रात्री ती मला जरा जास्तच चिपकत होती, जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत होती, आणि माझ्याकडे माझा बीबीएम पिन सुद्धा मागत होती. जर तो तिचा होणारा नवरा असता तर तिचं वागणं एखाद्या नवरी सारखं अजिबात नव्हतं.
First Published: Saturday, May 19, 2012, 11:37