Last Updated: Saturday, May 19, 2012, 22:52
www.24taas.com, लखनऊ 
उत्तर प्रदेशमध्ये बसपा प्रमुख मायावती आणि मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यामध्ये घमासान सुरु आहे. अखिलेश सरकार आल्यानंतर उत्तरप्रदेशात गुंडागिरी,अवैध धंद्यांचे प्रमाण वाढल्याने कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळले असल्याची टीका केली आहे.
तर अखिलेश यांनीही मायावतींना सडेतोड उत्तर देत १५ दिवसांत परिस्थीती बदलली जाईल असं आश्वासन दिलं आहे. तर मायावतींनी राष्ट्रपती निवडणुकींत युपीए आणि एनडीएने उमेदवार दिल्यानंतर आपल्याला योग्य वाटेल अशा उमेदवाराला मत देऊ असं सांगितल. त्यामुळे वेट अँड वॉचची भूमिका मायावतींनी स्विकारलेली दिसते.
मायावतीकडे सत्ता असताना मात्र या परिस्थितीतही काहीही बदल घडले नव्हते, हे देखील तितकेच खरे आहे. त्यामुळे आता मायावती आणि मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यातील वाद आता कोणत्या टोकाला जाणार ह्याकडेच साऱ्यांचे लक्ष लागलेलं आहे
First Published: Saturday, May 19, 2012, 22:52