लोकसभा मंगळवारपर्यंत तहकूब - Marathi News 24taas.com

लोकसभा मंगळवारपर्यंत तहकूब

 

 झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली
 
एफडीआयच्या मुद्यावर सरकार आणि विरोधक आपापल्या भूमिकेवर ठाम असल्य़ानं संसदेतील कोंडी आजही कायम आहे. दरम्यान मंगळवार सात डिसेंबरपर्यंत लोकसभा तहकूब करण्यात आली आहे.
 
हिवाळी अधिवेशनाच्या सलग नवव्या दिवशीही विरोधकांनी गोंधळ घातल्यानं दोन्ही सभागृहांचं कामकाज तासाभरासाठी तहकूब करण्यात आलं. मात्र गोंधळात कामकाज होत नसल्याने  सात डिसेंबरपर्यंत लोकसभा तहकूब करण्यात आल्याचे अध्यक्षांनी जाहीर केले.


 
संसदेत निर्माण झालेली कोंडी चिंतेचा विषय असून विरोधकांनी कामकाज चालू द्याव असं आवाहन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी केलंय. तर विरोधकांशी चर्चेचा प्रयत्न सुरू असल्याचं संसदीय कामकाज मंत्री पवनकुमार बन्सल यांनी सांगितलय. युपीएतले घटक पक्ष असलेल्या डीएमके आणि तृणमूल काँग्रेसनं यापूर्वीच एफडीआयला विरोध न करण्याची पंतप्रधानांची विनंती धुडकावून लावलीय. त्यामुळं तिढा आणखीनच वाढला आहे.

First Published: Friday, December 2, 2011, 07:03


comments powered by Disqus