ल्यूक म्हणतो, कबूल, कबूल... कबूल! - Marathi News 24taas.com

ल्यूक म्हणतो, कबूल, कबूल... कबूल!

www.24taas.com, नवी दिल्ली
 
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं प्रतिनिधीत्व करणारा ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ल्यूक पॉमर्सबॅच यानं आपण जोहल हमीदची छेडछाड केल्याची कबुली दिलीय.
 
ल्यूक पॉमर्सबॅचवर एका अमेरिकन महिलेची छेडछाड केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांनी पॉमर्सबॅचला अटकही केली होती. एका हॉटेलमध्ये झालेल्या आरसीबीच्या पार्टीत ही आपण जेवत असताना ल्युकने आपल्याला आणि आपल्या बॉयफ्रेंडला मारहाण केली, असा आरोप जोहल हमीद या अमेरिकन महिलेनं ल्यूकवर केला होता. सुरुवातीला ल्यूकने हा आरोप फेटाळून लावला. पण, आज मात्र त्यानं आपल्या या कृत्याची कबुली दिलीय. नशेत असताना आपण त्या महिलेवबरोबर छेडछाड केली तसंच तिच्या बॉयफ्रेंडलाही मारलं, असं त्यानी आज कबूल केलंय.
 
दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बगळुरुच्या ल्युक पॉमर्सबॅचनं केलेल्या अमेरिकन महिलेच्या छेडछाडप्रकरणी आणखी एक नवा उलगडा झालाय.  पीडित अमेरिकन महिला जोहलनं आता आपल्याला धमकावलं जात असल्याचा आरोप केलाय. आरसीबीचा खेळाडू के पी अपन्ना याच्यावर तिनं हा आरोप केलाय. यानंतर पोलिसांनी यादिशेनं तपास सुरु केलाय. तसंच दिल्लीच्या ज्या हॉटेलमध्ये हा सारा प्रकार घडला होता तिथल्या या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ल्युकबरोबर असलेल्या दुस-या खेळाडूची ओळख पटलीय, तो के पी अपन्नाच असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय.

First Published: Monday, May 21, 2012, 15:10


comments powered by Disqus