Last Updated: Monday, May 21, 2012, 22:41
www.24taas.com, नवी दिल्ली 
आयपीएलमधल्या काळ्या पैशाचा मुद्दा आज संसदेत गाजला. आयपीएलमधील काळ्या पैशाच्या चौकशीची मागणी क्रीडा मंत्री अजय माकन यांनी वित्त मंत्रालयाकडं केली आहे.
माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार किर्ती आझाद यांनी केलेल्या आरोपांची दखल घेत हे पत्र लिहिण्यात आलं आहे. आयपीएलमधील काळ्या पैशाबाबत सरकार गंभीर असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं.
फेमा कायद्याचं उल्लंघन केल्याबद्दल आयपीएलमधील १०७७ कोटी रुपयांबद्दल ईडी आणि आयकर विभागानं आयपीएल आणि बीसीसीआयला १९ नोटीसाही पाठवल्याची माहिती अजय माकन यांनी दिली.
First Published: Monday, May 21, 2012, 22:41