लोकपालसाठी अण्णा आंदोलन करणार नाही.... - Marathi News 24taas.com

लोकपालसाठी अण्णा आंदोलन करणार नाही....

www.24taas.com, नवी दिल्ली
 
लोकपाल विधेयकावरुन पुन्हा संघर्ष होण्याची शक्यता आहे. विरोधानंतर लोकपाल विधेयक सिलेक्ट कमिटीकडे बिल पाठवण्याचा प्रस्ताव राज्यसभेत मंजूर झाला. सरकारच्या प्रस्तावाला आवाजी मतदानानं मंजूरी देण्यात आली. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सिलेक्ट कमिटी आपला रिपोर्ट देण्याची शक्यता आहे. बसपानं मात्र सरकारच्या प्रस्तावाचं समर्थन केलं.
 
सुधारीत लोकपाल विधेयक राज्यसभेत सादर झाल्यावर गदारोळ झाला. दुसरीकडे या मुद्द्यावरुन टीम अण्णाही आक्रमक झाली. सरकारच्या निषेधार्थ टीम अण्णा २५ जुलैपासून जंतरमंतरवर उपोषणाला बसणार आहेत. मात्र या उपोषणात अण्णा हजारे सहभागी होणार नाही. दुसरीकडे विधेयकामधल्या प्रत्येक सुधारणेवर चर्चेची अपेक्षा माकपनं केली.
 
तर बसपानं सरकारच्या प्रस्तावाचं समर्थन केलं. त्यानंतर सामींचा प्रस्तावा आवाजी मतदानानं मंजूर झाला. सरकारच्या या भूमिकेनंतर टीम अण्णांनी थेट जळगावातून पुढल्या आंदोलनाचं रणशिंग फुंकलं. येत्या २५ जुलैपासून जंतरमंतरवर आंदोलन करणार असल्याची घोषणा करण्यात आली.
 
 

First Published: Monday, May 21, 2012, 22:48


comments powered by Disqus