Last Updated: Monday, May 21, 2012, 22:58
www.24taas.com, नवी दिल्ली 
दिल्लीतल्या दूध डेअरीचालकांविरोधात ग्वाला गद्दी समितीन आंदोलन तीव्र केलं. जंतरमंतरवर उपोषणानंतर दूध उत्पादक संसदेला घेराव घालण्यासाठी जात असताना त्यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी ग्वाला गद्दी समितीचे अध्यक्ष मोहन सिंग अहलूवालिया यांच्यासह अनेक दूध उत्पादकांना अटक करण्यात आली.
काही दिवसांपासून ग्वाला समितीनं आपलं आंदोलन तीव्र केलं आहे. दूध उत्पादकांना योग्य दाम मिळायला हवे अशी त्यांची मागणी आहे. डेअरीचालकांची मनमानी थांबायला हवी यासाठी ग्वाला गद्दी समिती आक्रमक झाली आहे.
त्यासाठी दिल्लीत त्यांचे आंदोलन सुरु आहे. जंतरमंतरवर उपोषण केल्यावर संसदेवर धडक मोर्चा काढणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी अटक केली आहे. दूधाची वाढती किंमती आणि भेसळीविरोधातही आंदोलन तीव्र करण्यात आलं आहे. आंदोलनात महिलाही मोठ्या संख्येनं सामील झाल्या होत्या.
First Published: Monday, May 21, 2012, 22:58